rai

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी

कोकण

rai

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने २३ ऑगस्ट पासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसतील. अशी माहिती परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान सभेत दिली.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. हि वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ट्रक, मल्टीएक्सल,ट्रेलर इत्यादी १६ टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल – सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्ट पासून मर्यादित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन,वडखळ, नागोठणे,कोलाड,इंदापूर, महाड,खेड,चिपळूण,संगमेश्वर,राजापूर,कणकवली,कुडाळ,सावंतवाडी,या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल.
२६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट व २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत अवजड वाहनांना या महामार्गावर बंदी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *