m

राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष, अजूनही निर्णायक बहुमत नाही

देश

m

नरेंद्र मोदी सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही. भाजप राज्यसभेत काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ज्येष्ठांच्या या सभागृहात आता भाजपचे ५८ खासदार तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे.मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार संपतिया उइके यांचा शपथविधी झाला. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले आहेत.
पुढील वर्षीपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे.पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली.
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मोदी सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं अडकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या ९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील ९ पैकी ८
जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *