floods-Plovdiv-region-July-31-2014

मुशेत पुलाच्या कामाला अखेर मुहुर्त सापडला

कोकण

floods-Plovdiv-region-July-31-2014

अलिबाग तालुक्यातील मुशेत मापगांव मार्गावरील पूल जीर्ण झाला होता. पुलाच्या दुरावस्थामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पुलावरून चोंढी,मुशेत, मापगांव ,बहिरोळे,बेलवली,कनकेश्वर ,कार्लेखिंड मार्गावरून सातत्याने अवजड वाहनांची ये-जा होती.मात्र पुलाची दुरावस्था पाहता त्यावरून अवजड वाहने जाणे धोकादायक होते. तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावे लागत होते. याबाबत आ. पंडित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या पाठपुरावाने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट सुरु असून मुशेत  पुलाचे बांधकाम नाबार्ड-२२ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्थावित करण्यात आले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *