ga

पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा,पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे नागरिकांना आवाहन

कोकण

 

ga

अलिबाग –  मागील काही वर्षापासुन ध्वनिप्रदूषणामुळे सामाजिक व निसर्गाचे स्वास्थ बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवसारख्या मंगलमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे येणारी भावी पिढी हि संस्कारित होऊन आनंददायी व पवित्र वातावरण तयार होईल. त्यामुळे डीजे सारख्या अतितीव्रतेचे स्पिकर्स लावून प्रसंगी दारूप्राशन करून हा सण केवळ नाचण्या पुरता मर्यादित ठेवू नका. असें आवाहन अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी केले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांसह डीजे व सार्वजनिक गणेश मंडळाच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय शाहिद निलेश तुणतुणे यांची स्मृती कायमच स्मरणात राहावी याकरिता गणेशउत्सव निमित्त घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास शहीद निलेश तुणतुणे यांच्या नावाने बक्षीस देण्यात येणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *