v

सत्ताधाऱ्यांचा विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार

महाराष्ट्र

v

सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारीच विधान परिषदेमध्ये नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं. विधानपरिषदेच्या कामकाजाची संहिता तयार होत नाही तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका सत्ताधारी यांनी घेतली आहे. त्यामुळे वेळापत्रकात भरपूर कामकाज दाखवण्यात आले असले तरी विधानपरिषदमध्ये किती कामकाज होणार का यांवर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहतांवर झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विधिमंडळात गाजला. विरोधकांनी मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला. त्यावर विरोधक बोलूच देत नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी करीत सभात्याग केला. तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडं उत्तर नसल्यानं सत्ताधारी सभागृहातून पळून गेल्याचा प्रत्यारोप विरोधकांनी केला आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *