w

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाणी स्वच्छता सर्वेक्षणात ९२ ग्रामपंचायतीना पिवळे कार्ड

कोकण

w

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रायगड जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा यासाठी पाणी व स्वच्छता विभाग जोमाने काम करीत आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणीही स्वच्छ मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याच्या स्रोताचे नमुने तपासले जातात. पाण्याचा स्त्रोत ७० टक्के असेल तर त्या ग्रामपंचायतीला  ग्रीन कार्ड प्रमाणपत्र दिले जाते. तर ६१ ते ३५ टक्के असेल तर त्या ग्रामपंचायतीला  पिवळे कार्ड दिले जाते,  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या २०१२-१७ स्वच्छता सर्वेक्षणात ७१३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून ९२ ग्रामपंचायती पिवळ्या कार्ड प्रमाणपत्र प्राप्त आहेत. ९२ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रामपंचायती २०१५ ते २०१७ अशी सलग तीन वर्ष पिवळ्या कार्ड प्रमाणपत्र प्राप्त राहिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *