bl

पालकांनो सावधान!

Uncategorized

bl

कालच आपल्या वाचनात ‘ब्लू व्हेल गेम ‘मुलांसाठी किती घातक आहे हे लक्षात आले असेल.लहान मुले हि जिज्ञासू वृत्तीची असतात.त्यांच्या या प्रवृत्तीमुळे पुढे काय असेल हि उत्सुकता त्यांना जास्त लागलेली असते. ब्लू व्हेल गेममध्ये विविध आव्हाने खेळणाऱ्यांपुढे एका मागोमाग एक ठेवलेली असल्याने त्यातील पहिले आव्हान पूर्ण केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हे आव्हान पूर्ण केले आता पुढचे काय हि उत्सुकता व पहिल्या यशा नंतर निर्माण झालेले धैर्य त्यामुळे तो पुढचे आव्हान स्वीकारण्याकडे वाटचाल करतो. हि आव्हाने फारच अघोरी स्वरूपाची असून ह्या गेममध्ये एकाग्रतेने ती ती संमोहित होतात व ब्लेडने शरीर ओरखाडणे, सुई टोचून घेणे यासारख्या कृती सहजतेने करून घेतात त्यामुळे मनप्रीत सिंग सारखे कोवळे जीव आपला जीव गमावतात. जगात २५० मुलांना आपला जीव गमवण्यास लावणारा जरी अटकेत असला तरी त्याने उपलोड केलेला हा जीवघेणा गेम संपूर्ण जगभर अस्तित्वात आहे. तरी यात पालकांनी जागृत असणे हा योग्य उपाय आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे हा जरी उपाय असला तरी आजच्या कालात प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल असतो, आणि मुलं त्यातील विविध गेम शोधण्यात पटाईत असतात. अशा परिस्थितीत इंटरनेट पॅक वा सुविधा उपलब्ध करून न देणे, मुले मोबाईलमध्ये गुंग असल्यास ती काय करतात हे जाणून घेणे व मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधने हे महत्वाचे ठरते. मुलांशी संवाद साधल्याने त्यांच्या काही शंका, इच्छा, जिज्ञासा यांचे वास्तव उत्तराने वा मार्गदर्शनाने पूर्ण होऊ शकतात. तेव्हा पालकांनो सावधान ! हा भयानक गेम किती जणांचा गेम करील या बाबत कल्पनाच करणे नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *