rbi

आरबीआयने केले रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांची कपात

देश

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेची चलन धोरण आज जाहीर झालं. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नवे दर जाहीर केले.
आता घरांचे हप्ते कमी होणार आहेत. रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व बँकेकडून ज्या दरानं कर्ज घेतात तो दर. रेपो रेट आता ६ टक्क्यांवर आलाय. साडे सहा वर्षातला हा सर्वात कमी रेपो रेट आहे. महागाई कमी झाल्यामुळे रिझर्व बँकेनं हा निर्णय घेतलाय. घरबांधणी क्षेत्राला यामुळे चालना मिळेल, तसंच घर घेणारे आणि उद्योजक, दोघांनाही कर्ज घेणं थोडं सोपं जाईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *