ad

जिल्हा रुग्णालय अलिबाग अतिसार नियंत्रण पंधरवडा, राज्यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह सुरु

कोकण

ad

अलिबाग – सध्या राज्यामध्ये ० ते ५ वयोगटातील १००० मुलांपैकी २१ ते २३ मुले हि वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होत असतात. त्यापैकी १० % मुले हि अतिसारामुळे दगावतात हे टाळण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने राज्यभर अतिसार पंधरवडा साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दि. १ ऑगस्ट परिचारिका प्रशिक्षणार्थी व इतर कर्मचारी यांनी अलिबाग येथे प्रभात फेरी काढू जनजागृती केली. या निमित्ताने बाह्यरुग्ण विभागामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण गवळी यांच्या उपस्थितीत अतिसार नियंत्रण पंधरवडा व स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकरी डॉ. सुहास मोरे यांनी अतिसार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. पाणी उकळून पिणे, जेवणापूर्वी व शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अतिसार झाल्या नंतर ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी घ्यावी. व त्यासोबत लिंबू पाणी, ताक, भाताची पेज, भाज्यांचे सूप घेण्याचा सल्ला दिला.
आज पासून राज्यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह सुरु होत असून या निमित्ताने जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील नवजात शिशु अतिदक्षता विभाग तसेच प्रसूती विभागामध्ये कांगारू माता देखभाल कक्षाचे उद्घाटन आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *