l

वीज कार्यालयात फॉर्म नसल्याने ग्राहकांची गैरसोय

कोकण

l

रोहा – रोहा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात तालुक्यातून दररोज शेकडो नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी येत असतात. या ग्राहकांना नवीन मीटर घेणे, वीज बीलाबाबतच्या तक्रारी, नावातील बदल अशा प्रकारच्या विविध कामासाठी अर्जाची गरज असते. परंतु वीज मंडळाच्या कार्यालयात स्टेशनरी उपलब्ध नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
वीज मंडळाकडून नागरिकांना विविध प्रकारचे अर्ज अल्पदरात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून स्टेशनरी उपलब्ध होत नाही. व स्टेशनरीसाठी निधी खर्च करण्याचे अधिकार आम्हाला नसल्याने ग्राहकांना लागणाऱ्या आवश्यक त्या अर्जाचा पुरवठा आम्ही करू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचा गैरफायदा घेत कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या झेरॉक्स चालकांकडून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. नवीन वीज मीटर घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एक पानी ए फॉर्मसाठी चार रुपये तर नावातील बदलाच्या तीन पानी अर्जासाठी रु. १२ झेरॉक्सवाल्याकडून उकलण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *