5522771184_3ca4aa9481_z

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

महाराष्ट्र

5522771184_3ca4aa9481_z

महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिध्द झाल्यानंतर बैलगाडी शर्यती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील.प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. प्राण्यांचे हाल केल्यास ३ वर्षे तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंड ठोठावला जाईल.
बैलगाडा शर्यतींवर ग्रामीण भागातील मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे या विधेयकामुळे त्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. बैलगाडी शर्यतींचा मार्ग मोकळा झाल्यानं बैलगाडा मालकांनी जल्लोष केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *