gal5

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम !

मुंबई

gal5

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर मुंबई आणि उपनगरातही पाऊस कायम असून मुंबईत पहाटेपासून संततधार सुरुच आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकलची वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे, तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील लोकल 10 मिनिटं उशिरा धावत आहेत.
अंधेरी, गोरेगाव, कुर्ला, घाटकोपरसह कल्याण, डोंबिवली परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *