mohan-bhagwat

शेतीला चांगेल दिवस यायचे असतील तर भाव मिळाला पाहिजे – आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत

महाराष्ट्र

mohan-bhagwat

शेतीला चांगेल दिवस यायचे असतील तर भाव मिळाला पाहिजे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ९० व्या वार्षिक पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.मोहन भागवत म्हणाले की, ”शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे, शेती समस्यांवरचं उत्तर नाही. तर शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग व व्यापार जगताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. तसेच शेतीमालाला योग्य दर व हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही,” असं त्यांनी सांगितल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. शिवाय शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीनेही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या कर्जमाफीवर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *