Mt-Kailash-2-640x480

भारतातून कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या भाविकांचा मार्ग चीनने रोखला!

देश

Mt-Kailash-2-640x480

भारतातून कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या भाविकांचा मार्ग चीनने रोखला आहे. कैलाश मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नथुला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यंदा या यात्रेसाठी एकूण ३५० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी ठरल्या कार्यक्रमानुसार सिक्किम-चीन सीमेवरील नथुला खिंडीपर्यंत पोचली होती. १९ जून रोजी त्यांना खिंड पार करून चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु खराब हवामानामुळे त्या दिवशी त्यांना खिंड पार करता आली नाही. बेस कॅम्पवर थांबून २३ जून रोजी यात्रेकरून पुन्हा खिंड ओलांडण्यास गेले तेव्हा चिनी सैनिकांनी परवानगी नाकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *