traind

मुसळधार पावसामुळे मध्य व हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम

मुंबई

traind

जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस मुंबईत सुरु आहे. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला येणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल होणार आहेत. पश्चिम पूर्व उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम असल्याने त्याचा फटका जाणवण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक ३० मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहचूक १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. कुर्ला-सायन रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
सखल भागांतही पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दादर, हिंदमाता या भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.मुंबईतील मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, घाटकोपर, अंधेरी, वांद्रे या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईच्या अन्य भागांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *