GST-Bill-270x202

कॉमर्स पदवीधरांना जीएसटीमुळे नोकरीची नवीन संधी उपलब्ध !

देश

GST-Bill-270x202

देशात 1 जुलैपासून जीएसटी अर्थात नवी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच कर प्रणाली असेल. कॉमर्स पदवीधरांना जीएसटी निश्चितच दिलासा देणारा आहे. कारण जीएसटीमुळं त्यांच्यासाठी काही नवीन संधी उपलब्ध होणार आहे .कॉमर्स ग्रेज्युएट जीएसटी प्रॅक्टिशनर होऊ शकतात . जीएसटी अंतर्गत प्रत्येक टॅक्स पेयरला वर्षाकाठी 37 रिटर्न फाईल करावे लागतील. या हिशोबाने देशभरात एका वर्षात 29.6 कोटी रिटर्न फाईल होतील.प्रत्येक रिटर्नची फी 250रूपये असेल . अशा वेळी वर्षभरात 7400 कोटी चा रेव्हीन्यू जमा होईल .मग अशा परिस्थितीत रिटर्न फाईल करणाऱ्या जीएसटी प्रॅक्टिशनरची नोकरी कॉमर्स पदवीधर करू शकतात.
जीएसटी प्रॅक्टिशनरला जीएसटी पीसीटी 1 फॉर्म आधी भरावा लागेल.त्यानंतर सरकारी अधिकारी तो फॉर्म चाचपून योग्यता पाहून जीएसटी पीसीटी2 सर्टिफीकेट इश्यू करेल .मग सरकारनं या पदासाठी घेतलेली परीक्षा द्यावी लागेल .ही परीक्षा पास करायला जीएसटीचे उत्तम ज्ञान असावं लागेल .ती परीक्षा पास केल्यावर जीएसटी प्रॅक्टिशनर होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *