cm-580x395

राज्याची आर्थिक स्थिती बिकट, सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई

cm-580x395

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे.पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे. राज्य सरकारच्या मनात होतं, त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असं केलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणलं.
वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करु नका अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली, असंही मुख्यमंत्री म्हणाले.कर्जमाफी करण्याआधीच अर्थसंकल्पात ४००० कोटींची तूट आहे. मात्र तरीही पैसा उभा करू असा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *