borewell-2

साताऱ्यातील विरळीमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

महाराष्ट्र

borewell-2

माण तालुक्यातील विरळी गावात ही घटना घडली होती. साताऱ्याच्या माण तालुक्यामधील विरळी गावातील महिला दुपारी आपल्या ६ वर्षाच्या मुलाला घेऊन शेळ्या राखण्यासाठी माळरानावर गेली होती. खेळता-खेळता हा मुलगा उघड्यावर असलेल्या बोरवेलमध्ये पडला. आईसमोरच घडलेल्या घटनेमुळे तिनं मोठ्यानं मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरडा केली. त्यामुळे गावातील लोक घटनास्थळी धावत आले.
त्याला वाचवण्यासाठी आपत्कालिन विभागाचे जवान आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आलं नाही, त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं परंतु, तोपर्यंत मातीखाली गुदमरून मंगेशचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *