rbi

बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

देश

rbi

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि १९ राष्ट्रीय बँकांकडून एका वकिलाने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यावर रिझर्व्ह बँकेने केलेला खुलासा बघून वकिलाला धक्काच बसला. लॉकरमधून वस्तू गहाळ किंवा चोरी झाल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई देण्यासाठी नियमावली किंवा निकष अस्तित्वात नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या लॉकरमधून मौल्यवान वस्तू हरवल्यास, गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. माहितीअधिकारांतर्गत दाखल झालेल्या अर्जावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने हे स्पष्टीकरण दिले आहे.लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने चोरीला गेल्यास नुकसान भरपाईबद्दल कोणतेही निर्देश बँकांना जारी करण्यात आलेले नाहीत, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही समावेश आहे.
लॉकर भाडेतत्त्वावर घेताना बँकेच्या ग्राहकांशी केल्या जाणाऱ्या करारात यासंदर्भात कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे युद्ध, आंदोलन, चोरी किंवा दरोडा अशा कुठल्याही परिस्थितीत बँकेतल्या लॉकरमधून कोणतीही वस्तू गहाळ झाली, तरी त्याला संपूर्णपणे संबंधित खातेदारच जबाबदार राहील, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.

बँक ऑफ इंडिया, ओबीसी, पीएनबी, युको आणि कॅनरा बँकांसह अन्य काही बँकांनी याबाबत उत्तर दिलं आहे. लॉकरच्या बाबतीत बँक आणि ग्राहकांचं नातं हे घरमालक आणि भाडेकरुंसारखं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लॉकरमधील सामानासाठी ग्राहकच जबाबदार असतो.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *