modi-1

सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य पाहायला मिळालं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश

modi-1

सर्जिकल स्ट्राईकमुळं जगाला देशाचं सामर्थ्य पाहायला मिळालं, असं वक्तव्य करत अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे. मोदींनी आज (सोमवार) अमेरिकेत भारतीयांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामांचादेखील उल्लेख केला. ‘भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे देशाच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडले. भारताची भूमिका कायम संयमाची राहिली आहे. मात्र ज्यावेळी आवश्यकता असेल, त्यावेळी भारत आपल्या शक्तीचे दर्शन घडवू शकतो,’ असे यावेळी मोदींनी म्हटले. भारत अनेकदा दहशतवादी हल्ल्यांना बळी पडला आहे असे म्हणत ‘दहशतवादाचे परिणाम किती भयंकर असू शकतात, हे आम्ही अनेकदा जगाला सांगितले आहे,’ असेदेखील मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मोदींनी विशेष कौतूक केलं. सोशल मीडियाचा खरा उपयोग स्वराज यांनी करून दाखवला. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या ८० हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचं मोदी म्हणाले.
भारत हा जागतिक नियम मानणारा देश आहे. जगाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच आम्ही ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. भारताने कायम विकासाचा मार्ग धरला आहे. जागतिक नियमांच्या चौकटीत राहणे हा भारताचा इतिहास असून तीच भारताची संस्कृती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *