mangaon-1-580x395

रायगडमध्ये कुंडलिका नदीपात्रात पर्यटनासाठी गेलेल्या ५० पर्यटकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं

महाराष्ट्र

mangaon-1-580x395

पावसाने रायगड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील ५० ते ५५ तरुण तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंडनजीकच्या नदीपात्राजवळ गेला होता.
वर्षा सहलीसाठी देवकुंड परिसरातील धबधब्याखाली हे तरूण भिजण्यासाठी आले होते. काल रात्रीपासून रायगडमध्ये पाऊस पडत होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमालीचा वाढला. त्यामुळे सकाळी धबधब्यावर भिजण्यासाठी आलेले काहीजण तिथेच अडकून पडले.
दुथडी भरुन वाहणारी नदी ओलांडणं त्यांना अशक्य होऊन बसलं होतं. मात्र पोलीस आणि राफ्टर्स यांनी दोर टाकून या सर्वांना सुखरुप वाचवलं. या दिव्यातून सहिसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे सर्वजण मुंबईतल्या पोद्दार, केळकर आणि एच.आर कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं समजतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *