kovind-files

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

देश

kovind-files

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी संसदेत राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपने एनडीएतील घटक पक्षांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे एनडीएतील अनेक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारखे भाजपचे जेष्ठ नेतेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे आत्तापासून बऱ्यापैकी बहुमत असल्याने अर्ज भरतानाही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आत्मविश्वास झळकत होता.
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जातो आहे. ‘देशाचे संविधान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. असे रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *