Passport

पासपोर्टच्या शुल्कामध्ये १० टक्के कपात – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

देश

Passport

पासपोर्टच्या शुल्कामध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. मात्र ८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांनाच ही सवलत मिळणार आहे. तसेच पासपोर्ट हा आता इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी ही महत्त्वाची घोषणा केली. पासपोर्ट अॅक्ट १९६७ ला ५० वर्षे पूर्ण झाल्याने ही सवलत देण्यात आली असल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. पासपोर्ट सेवा सुलभ व्हावी यासाठी देशात प्रत्येक ५० किलोमीटरनंतर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र आता नव्या सवलतीनुसार ६० वर्षे वरचे वय असलेल्या नागरिकाला पासपोर्ट काढण्यासाठी १५०० ऐवजी १३५० रुपयेच द्यावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *