btp_june20

बंगळुरु एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने राष्ट्रपतींचा ताफा रोखला.

देश

btp_june20

बंगळुरुमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने माणसुकीचे दर्शन घडवत रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करुन दिला. विशेष म्हणजे यासाठी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
वाहतूक पोलिस उपनिरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांच्या या साहसी कृत्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांचा सन्मान केला.
राष्ट्रपतींचा ताफा राजभवनच्या दिशेने जात असल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. पण या ट्रॅफिकमध्ये एक अॅम्ब्युलन्सही अडकली होती. त्यावेळी घटनस्थळी तैनात असलेले वाहतूक पोलिस उप निरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांनी प्रसंगावधान दाखवून राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि अॅम्ब्युलन्सला वाट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *