Amit-Shah-and-Ramnath-Kovind

Amit-Shah-and-Ramnath-Kovind

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.रामनाथ कोविंद २३ जून रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रामनाथ कोविंद यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे. रामनाथ कोविंद यांना एनडीएतील घटकपक्षापैकी शिवसेना वगळता सर्वांचा पाठिंबा आहेच. त्याचबरोबर दक्षिणतील राज्यांनी रामनाथ कोविंद यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *