glass-1587258_960_720

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून दिलासा दूध खरेदीत लीटरमागे ३ रुपयांची वाढ

महाराष्ट्र

glass-1587258_960_720

दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलं आहे. दूध खरेदी दरात प्रति लिटर ३ रुपये वाढ करण्यात आली आहे अशी घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली.गायीचे दूध दर २४ वरून २७ रुपये तर, म्हैशीचे दूध दर ३३ वरून ३६ रुपये करण्यात आले आहे.
पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या खरेदी दरातील वाढीला मान्यता दिला आहे. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्री दरात वाढ केलेली नाही.तसे निर्देश सर्व दूधसंघांना देण्यात आले आहेत. जर दूधसंघांनी निर्देश पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *