Union minister Arun jaitley at the press conference after Cabinet meeting in new Delhi on Wednesday express photo by prem Nath Pandey 24 may 17

 

Union minister Arun jaitley at the press conference after Cabinet meeting in new Delhi on Wednesday express photo by prem Nath Pandey 24 may 17

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा कायदा लागू करण्यासाठी मध्यरात्री संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात येणार आहे. १ जुलैला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जीएसटी लागू होण्याशिवाय इतर घोषणाही केल्या जाऊ शकतात.संपूर्ण देशाला एकाच कर प्रणालीत बांधणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचं लोकार्पण ३० जूनला रात्री १२ वाजता होणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जीएसटीचं लोकार्पण केलं जाईल.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. १ जुलैपासून देशात नवी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.शिवाय सर्व खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेही कार्यक्रमासाठी उपस्थित असतील.
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *