19122131_486323805046736_2509249520731160576_n

19122131_486323805046736_2509249520731160576_n

दोन दिवसांची विश्रांती आणि पुणेकरांचा पाहुणचार आटोपून माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी सकाळी सहा वाजता प्रस्थान ठेवलं, माऊली दिवेघाटातून सासवडला तर तुकोबाराय लोणी काळभोरला मुक्कामी जाणार आहेत, यात लक्षवेधी असतो तो माऊलींच्या पालखीचा दिवेघाटातला प्रवास.
दुपारी तीननंतर पालखी दिवेघाटात येते, त्या आधी पहाटेपासूनच वारकरी दिवेघाट चढायला सुरुवात करतात. दिवेघाटातल्या वारकऱ्यांच्या प्रवासाचं दृश्य अतिशय नयनरम्य असतं, पालखी जेव्हा घाटात येते तेव्हा वारकरी सर्व शीण विसरून जातात, हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांचीही दिवेघाटात गर्दी असते.त्यामुळं ज्ञानोबा आणि विठू-रखूमाईच्या जयघोषानं आज दिवे घाट दुमदुमणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *