183393-300626-vinod1

गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल – शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

महाराष्ट्र

183393-300626-vinod1

दहावीच्या निकालानंतर सर्व विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते. एक दिवस उशिर होईल पण २२ जुनपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरळीत होईल असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी व्यक्त केला आहे.सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. उद्या एक दिवस पूर्ण घेऊन सर्व प्रकारच्या सुधारणा करण्यास दिला आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा भरण्याची गरज नाही. कला आणि स्पोर्ट्स विषयातही पुर्नमुल्यांकनाची सुविधा मिळणार आहे, फेरतपासणीसाठी अर्जही करता येणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषय अवघड जातात, त्यांना गणिताशिवाय करिअर करता येऊ शकतं.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे उद्या बुधवारचा एक दिवस आम्ही सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी घेणार आहोत, आणि गुरुवारपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती तावडेंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *