623301456

स्विस बँकेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा

विदेश

623301456

इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकांचा खूप कमी पैसा स्विस बँकांमध्ये असल्याची माहिती स्वित्झर्लंडंच्या खासगी बँकर्सच्या समूहाने दिली आहे. स्विस बँकेत भारतीयांपेक्षा सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या भागातील पैसा जास्त असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातला बहुतांश काळा पैसा हा स्विस बँकेत जमा असल्याचा दावा केला जातो. पण त्या दाव्याला या समूहाने फेटाळून लावलं आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारतीयांचे जवळपास 8 हजार 392 कोटी रुपये असल्याचं कळतं आहे. अर्थात या बँकेत इतर देशांचा किती पैसा आहे, याची आकडेवारी मात्र मिळालेला नाही.
काही दिवसांपूर्वीच स्वित्झर्ल्डनं आपल्या बँकेत जमा असलेल्या पैशांची माहिती त्या त्या देशांना देण्याचा करार केला आहे. यामध्ये भारतासह तब्बल 40 देशांचा समावेश आहे. त्याच अंतर्गत ही माहिती जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वित्झर्लंडने एईओई विधेयक संमत केल्यानंतर मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईला मोठे यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. सत्तेत आल्यानंतरही मोदी सरकारकडून देशातील आणि विदेशातील काळा पैसा खणून काढण्यासाठी सातत्याने अनेक मोहीमा राबवण्यात आल्या होत्या. तसेच स्विस बँकेत दडवून ठेवलेल्या काळ्या पैशांचा माग काढण्यासाठीही सरकारचे अनेक प्रयत्न सुरू होते. मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या करारामुळे आता स्वित्झर्लंडकडून भारताला स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *