Vitthal-Rukmini

देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान

महाराष्ट्र

Vitthal-Rukmini

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, हा प्रस्थान सोहळा हा वारकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करतो.विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी देहु मध्ये चार लाख भविक दाखल झाले आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ३३१ दिंड्या सहभागी झाल्या असून पालखी सोहळ्याचं हे ३३२ वं वर्षं आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचं पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल. तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *