Cm-Devendra-Fadnavis-Helicopter-580x395

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे – एएआयबी

महाराष्ट्र

Cm-Devendra-Fadnavis-Helicopter-580x395

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये अपघात झाला होता. या अपघातासाठी हेलिकॉप्टरच्या वैमानिकाची चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाने हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे विमान अपघात तपास पथकाने एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली आणि अहवाला सादर केला.
प्राथमिक अहवालानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाली.
लातूर जिल्ह्यातील निलंग्यात २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर तब्बल ८० फुटांवरून खाली कोसळले होते. उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रण गमावल्यामुळे हेलिकॉप्टर खाली येत गेले. या दरम्यान हेलिकॉप्टर विजेच्या खांबावरही आदळले होते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने तसे काही घडले नव्हते. सुरूवातीला हेलिकॉप्टरच्या पंख्यातील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्राथमिक चौकशीत ‘एएआयबी’नं वैमानिकाच्या चुकीवर बोट ठेवले आहे. अपघाताच्या दिवशी लातूरमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपेक्षा होता. जास्त तापमानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळा येतो. अशावेळी सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरमध्ये कमी वजन घेऊन उड्डाण करणे अपेक्षित असतं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *