Dosa231

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट :अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जण दोषी

मुंबई

Dosa231

१९९३मध्ये मुंबईत झालल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबु सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह पाच जणांना विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. विशेष टाडा कोर्टाने शुक्रवारी हा निकाल दिला. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम, अशी त्या सात आरोपींवर शेवटची सुनावनी झाली.
दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुस्तफा डोसा यानं दुबईत बसून पाकिस्तानच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा पाठवला. रायगडच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. याच स्फोटकांच्या जोरावर मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणे दहशतवाद्यांना शक्य झाले, असा आरोप ठेवला होता. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा आरोप ग्राह्या मानत विशेष टाडा न्यायालयाने डोसाला दोषी ठरवले.
देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेलं मुंबई शहर १२ मार्च १९९३ या दिवशी हादरून गेलं. या दिवशी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण मृत्युमुखी पडले. तर, ७१३जण जखमी झाले.कुणी आपली आई..तर कुणी बाबा…कुणी भाऊ, तर कुणी बहीण गमावली. या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले, ज्यांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *