chopper-news

भारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा हजार कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला रद्द

देश

chopper-news

संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन आठवड्यांनंतर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधीच भारतीय संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेसोबतचा हेलिकॉप्टर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिकेकडून १६ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती. हेलिकॉप्टरच्या किमतीवर बराच काळ भारत आणि अमेरिकेत वाटावाटी सुरु होत्या. यानंतर संरक्षण मंत्रालयाने हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून भारत १६ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *