Devendra-Fadnavis

‘राज्यात भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

Devendra-Fadnavis

राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार आहे. कोणाला पाठिंबा काढून घ्यायचा असेल तर खुशाल घ्यावा, असं विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. शिवसेनेनंही अनेकदा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली आहे. राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे त्यांच्या मंत्र्यांनी अनेकदा सांगितलं होतं. निवडणुकांनंतर आम्हीच सत्ता स्थापन करु, असा माझा विश्वास आहे.
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता जनता भाजपलाचा कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं अचूक ‘नेम’ साधून शिवसेनेशी युती केली आणि सरकार स्थापन केलं. सत्तेत राहूनही हे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *