LONDON-FIRE-580x395

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर या इमारतीला भीषण आग

विदेश

LONDON-FIRE-580x395

पश्चिम लंडनमध्ये ‘ग्रेनेफेल टॉवर’ या २७ मजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापासून ते अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे.
पश्चिम लंडनमधील या इमारतीला स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी आग लागली. यात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. त्यामुळे आगीत अडकलेल्या नागरिकांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे.
अग्निशमन दलाचे २०० जवान ४० गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप आग आटोक्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *