_ce4fc3e6-4ff4-11e7-869c-505e32be9126

मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी

महाराष्ट्र

_ce4fc3e6-4ff4-11e7-869c-505e32be9126

मुंबईसह राज्यभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडासह पावसाने जोरदार धुमशान घातलं. लोअर परळ ,वरळी, लालबाग आणि दादर परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मुंबईची लाईफलाईन स्लो ट्रॅकवर आली. मध्य आणि हार्बरमार्गावरील लोकल धीम्या गतीने सुरू आहे.
तर अनेक भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. तसंच काही भागांत जोरदार वादळामुळे झाडे उन्मळून पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली.मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबा, नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेडमध्ये वीज कोसळून पाच महिलांचा मृत्यू झाला. पुण्यातही मान्सूनने जोरदार सलमी दिली. दोन तास बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. मनमाडमध्येही पावसाने हजेरी लावली.येत्या 48 तासांमध्ये कोकणासही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलाय.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *