cabinet-meet-580x395

अल्पभूधारक शेतक-यांना पेरणीसाठी १० हजार रुपये मिळणार

महाराष्ट्र

cabinet-meet-580x395

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीपाच्या बी-बियाण्यांसाठी अडचण येऊ नये, यासाठी कर्जमाफी होईपर्यंत १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.खरीपासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ही रक्कम नंतर कर्जाच्या रक्कमेतून कपात केली जाईल.
कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. ती ८ दिवसात व्हावी, अशी अपेक्षा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीत मांडला. मात्र ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना १० हजार रुपये बी-बियाण्यांसाठी द्यावे. ते नंतर कापून घ्यावे, मात्र आता तातडीने मदत मिळावी म्हणून हे १० हजार द्यावेत, अशी मागणी केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *