supreme-court

नीट परीक्षेचा निकाल २६ जून आधी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

देश

supreme-court

सुप्रीम कोर्टानं सोमवारी मद्रास हायकोर्टाकडून ‘नीट’ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली असून, २६ जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. सीबीएसईने मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
महाराष्ट्रातून जवळजवळ पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे.
नीट परीक्षा १० प्रादेशिक भाषांतून घेतली घेते. इतर भाषांमधले पेपर्स इंग्लिशपेक्षा सोपे असतात, असा दावा एका विद्यार्थ्यानं केल्यानं मद्रास उच्च न्यायालयानं निकालांना स्थगिती दिली होती. हा निकाल ८ जून रोजी अपेक्षित होता. सुप्रिम कोर्टाच्या निकालानं अनेक विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला
पण मद्रास हायकोर्टाच्या स्थगितीमुळे साडे ११ लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने सीबीएसईच्या याचिकेवरील सुनावणीवेळी मद्रास हायकोर्टाची बंदी उठवली असून, २६ जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश सीबीएसईला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *