glass-1587258__340

दोन-तीन दिवसांत दुधाचे दर वाढणार – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर

महाराष्ट्र

glass-1587258__340

दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळालं आहे. येत्या दोन-तीन दिवसात दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
दुधाच्या नव्या दरांनुसार सध्याचा २४ रुपये लिटरनं असणारा गाईच्या दुधाचा दर आता २७ रुपयांपर्यंत वाढणार आहे. तर ३३ रुपये लिटरनं म्हशीच्या दुधाचा असणारा दर आता ३७ रुपयांपर्यंत वाढणार आहे.
येत्या तीन दिवसात दुधाचे नवे दर लागू होणार असून दूध संघांना हे नवे दर दूध उत्पादकांना देणं बंधनकारक असणार आहे.शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभं राहील, असं राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले आहेत. शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर वाढवले असले तरी सामान्य लोकांचाही सरकार विचार करत आहे. मध्यमवर्गीयांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. मात्र बळीराजाला आधार देण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असंही जानकर यावेळी म्हणाले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *