bp19

राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू – पुणे वेधशाळा

महाराष्ट्र

bp19

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस घेऊन येणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी राज्यात प्रवेश केल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. गुरुवारी दक्षिण कोकणातील वेंगुर्ला येथे मोसमी वारे पोहोचले असून कोकण, मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागांत मोसमी वारे सरकण्यासाठी हवामान अनुकूल आहे. दरम्यान, कोकणपट्टीत सर्वत्र पाऊस सुरू असून मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव, नंदुरबार येथे पावसाच्या सरींचा प्रभाव वाढला आहे.आता पुढच्या ७२ तासात मान्सूनचं कोकणच्या दिशेनं पुनरागमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
राज्यातल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असताना मुंबईतही रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई शहर, दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसंच दादर, प्रभादेवी, लालबाग, भायखळा भागात रात्री मुसळधार पाऊस झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *