railrokoprotest

मंदसौरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको

मुंबई

railrokoprotest

मंदसौरमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतकरी मारले गेले.मंदसौरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांना निमचमध्ये ताब्यात घेतल्याचा निषेधही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
आजच राहुल गांधी यांना निमचमध्ये ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर मोदी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी टीकेचे ताशेरे झोडले होते. आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको करण्यात आला. या आंदोलना पोलिसानी लक्ष घालून रेल रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना दूर केले. राहुल गांधी यांना ताब्यात का घेण्यात आले आहे? असा प्रश्न विचारत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला. एवढंच नाही तर मंदसौरच्या शेतकऱ्यांना राहुल गांधी यांना का भेटू दिले जात नाही? असाही प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करत आहेत असा आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *