pipmpari44

सातजन्मी हिच पत्नी मिळो,पुरूषांनीच वडाला फेऱ्या घालत वटपौर्णिमा साजरी केली.

महाराष्ट्र

pipmpari44

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करून सातजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना महिला करतात. पण पुण्यात पिंपळे -गुरूव इथं थोडं वेगळं पाहायला मिळालं. इथं पुरूषांनीच वडाला फेऱ्या घालत वटपौर्णिमा साजरी केली.ढोल ताशाच्या गजरात येत पुरुषांनी वट पौर्णिमेची पूजा केली. आज महिला पुरूषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. त्या नेहमी साथ देतात. म्हणूनच महिलांनीच का? पुरूषांनीही जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना चक्क त्यांनी केलीय.
पुण्यातील ह्यूमन राईट प्रोटेक्शन अँड अवेरन्स असोसिएशनच्या या परिवर्तनवादी संस्थेनं ही आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *