pranab-5-11-380

देशात पुरेशा प्रमाणात रोजगारसंधी निर्माण होत नाहीत- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

देश

pranab-5-11-380

देशात दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. पण सरकारनेच राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१४ पासून डिसेंबर २०१५ या दोन वर्षांच्या काळात प्रत्यक्षात ५ टक्के रोजगारही उपलब्ध झाले नाही, असे दिसून येते. एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना आता राष्ट्रपती मुखर्जी यांनीही बेरोजगारीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. देशात पुरेशा प्रमाणात रोजगार संधी निर्माण होत नाहीत. देशातील उद्योगांसाठी पूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या व्यवस्थापन शिक्षणाची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत विविध क्षेत्रांत संपादित केलेल्या यशाचा लेखाजोखा मांडला जात आहे. त्याचवेळी राष्ट्रपतिपदाचा एका महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. देशातील युवकांना अधिकाधिक रोजगार देण्यावर भर दिला पाहिजे, त्यांच्यासाठी पुरेशा आणि नवीन रोजगार संधी निर्माण करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *