Rashtrapati-Bhavan-580x395

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर,१७ जुलैला मतदान

देश

Rashtrapati-Bhavan-580x395

राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलैला मतदान होणार आहे. तर तीन दिवसांनंतर म्हणजेच २० जुलैला मतमोजणी होणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केलीये.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द २४ जुलैरोजी संपणार आहे. नव्या राष्ट्रपतींनी २५ जुलैरोजी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी किमान साठ दिवस अगोदर निवडणुकीची घोषणा करणे बंधनकारक असल्याने मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, अन्य निवडणूक आयुक्त डॉ. ए.के. ज्योती व ओ.पी. रावत यांनी बुधवारी कार्यक्रमाची घोषणा केली. त्याची अधिसूचना १४ जून रोजी निघेल आणि नेमकी मतदारांची संख्या (म्हणजे आमदार, खासदारांचा समावेश असलेले मतदार मंडळ) त्याचवेळी जाहीर होईल. या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत २८ जूनपर्यंत आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खासदार व आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. ७७६ खासदार आणि ४,१२० आमदारांच्या मतांची एकूण किंमत १०,९८,८८२ इतकी आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, जिंकण्यासाठी लागणारया मतांची बेगमी भाजपकडे आहे. त्यामुळे विरोधकांच्या आव्हानाची फारशी काळजी भाजपला नाही. राज्यघटनेशी बांधीलकी असलेला उमेदवार दिला तर निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत विरोधकांतील काहींनी दिले आहेत.
या निवडणुकीसाठी खासदार आपल्या इच्छेनुसार मतदान करू शकतात. राजकीय पक्षांना व्हीप काढता येणार नाही असं झैदी यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *