kerala-monsoon6

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी,

महाराष्ट्र

kerala-monsoon6

मान्सूनपूर्व पावसानं राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली असली तरी, येत्या ४८ ते ७२ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.
उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. बुधवारी मध्यरात्री मुंबई शहर, मुलुंड, भांडुप, अंधेरी, जोगेश्वरी या भागात पावसाच्या सरी पडल्या, तर ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, वसई भागातही पावसानं दमदार हजेरी लावली.हवेत गारवा निर्माण झाल्यानं सकाळी सकाळी नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तसंच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळही उडाली. मुंबईतल्या इतर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *