21_34_54_web

21_34_54_web

पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे.देशातील अग्रगण्य तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणार आहे. इंडियन ऑईलपाठोपाठ भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या दोन कंपन्याही लवकरच हा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे. १ मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे, ज्याची आता देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.एवढंच नाहीतर पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेल घरपोच (होम डिलिव्हरी) पोहचवण्याचाही विचार करतेय. जर यात यश मिळालं तर देशभरात हा प्रयोग केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *