Mumbai_Sessions_Court

मुंबई सत्र न्यायालयात थरार,एका आरोपीने दुसऱ्या आरोपी भोसकलं

मुंबई

Mumbai_Sessions_Court

मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारी थरारक घटना घडली. आर्थर रोड तुरुंगातील गँगवॉरची झलक सत्र न्यायालयाच्या आवारातही दिसून आली. एका आरोपीने दुसऱ्या आरोपीला न्यायालयाच्या आवारातच भोसकल्याची घटना घडली असून या घटनेने न्यायालयाच्या आवारात खळबळ माजली होती.
उदय पाठक हा साल २०११ मधील कुरार व्हिलेज परिसरात अप्पापाडा टेकडीवर झालेल्या भीषण हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर चार जणांच्या हत्येचा खटला सुरु आहे. चेतन धुळे, दिनेश अहिरे, गणेश करंजे आणि भारत कुदळे या चौघांचे विवस्त्र मृतदेह ६ जून २०११ रोजी सापडले होते.
तर दुसरा आरोपी कल्पेश पटेल हा आर्थर रोड जेलमधून मोबाईलच्या सहाय्याने खंडणी वसुलीचा धंदा करत असल्याचं बोललं जात आहे.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. कोर्टात लपवून आणलेल्या धारदार शस्त्राने उदय पाठकने अचानकपणे कल्पेश पटेलवर वार केला. मात्र उपस्थित पोलिसांनी ताबडतोब दोघांना वेगळ करत उदयला ताब्यात घेतलं. कल्पेशला त्यानंतर वैद्यकीय तपासणीकरता नेण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *