kulbhushan-jadav-spy-india-1

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

देश

kulbhushan-jadav-spy-india-1

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरागिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायलयाचा हा निर्णय पाकिस्तान मान्य करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानने या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल केली आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
कोण आहेत कुलभूषण जाधव
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी ३ मार्च २०१६ मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *