CM-EREER

CM-EREER

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलेल्या आश्वासनानंतर आता करमाळ्यातल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे.मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून धनाजी चंद्रकांत जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वीट गावातील या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर करमाळ्यात आंदोलन करण्यात आलं होतं.त्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख यांनी वीट गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोलणं करुन दिलं.
मुख्यमंत्र्यांनी फोनवरून धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं तसच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. त्यासोबतच, इतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे. एक मुलगा बारावी आणि दुसरा दहावीला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *